एकच अट अन् भारतातील एकमेव अल्बम ज्याची गाणी देशाच्या पंतप्रधानांनी लिहिली, अनेकांना…
भारतीय संगीतविश्वात काही अल्बम असे आहेत, ज्यांची आठवण आजही रसिकांच्या मनात कायम आहे. असाच एक अनोखा प्रयोग 2002 मध्ये झाला होता. माजी पंतप्रधानांच्या कवितांवर हा अल्बम तयार करण्यात आला होता.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता जगजीत सिंह यांना विशेष आवडत होत्या. त्यांच्या रचनांवर अल्बम बनवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र, कवितांमधील मूळ शब्द बदलायचे नाहीत, अशी अट अटलजींनी ठेवली होती.
जगजीत सिंह यांनी ही अट मान्य केली. त्यांनी अटलजींच्या कवितांना आपल्या आवाजातून आणि संगीताच्या माध्यमातून वेगळी ओळख दिली.
2002 मध्ये 'संवेदना' हा अल्बम प्रदर्शित झाला. यामध्ये 'क्या खोया क्या पाया' या रचनेचाही समावेश होता. कवितांना गझलच्या शैलीत सादर करण्यात आले.
या अल्बमच्या म्युझिक व्हिडिओमध्ये शाहरुख खान दिसले होते. त्यांच्या भावनिक अभिनयाने व्हिडिओकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
व्हिडिओची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने झाली होती. या विशेष प्रकल्पाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. कविता, संगीत आणि दिग्गज कलाकारांच्या सहभागामुळे हा अल्बम संस्मरणीय ठरला.