AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : नोकरीमध्ये प्रमोशन हवंय? मग ऑफिसमध्ये होणाऱ्या या छोट्या-छोट्या चुका टाळाच, फेंग शुई काय सांगतं?

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्र हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जेच्या आधारावर कार्य करतं, त्याचप्रमाणे फेंग शुई देखील याच दोन मुख्य घटकांवर आधारलेलं आहे, अनेकदा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी काही छोट्या -छोट्या चुका करत असतो, त्याचा फटका आपल्याला बसतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

Feng Shui : नोकरीमध्ये प्रमोशन हवंय? मग ऑफिसमध्ये होणाऱ्या या छोट्या-छोट्या चुका टाळाच, फेंग शुई काय सांगतं?
Feng Shui Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 9:26 PM
Share

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्र हे पॉझिटिव्ह ऊर्ज आणि निगेटिव्ह ऊर्जा या दोन गोष्टींवर कार्य करते, त्याच प्रमाणे फेंग शुई देखील याच दोन मुख्य घटकांवर आधारलेलं आहे. फेंग शुईनुसार आपण अनेकदा घरात किंवा ऑफिसमध्ये अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा एखाद्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला अनेक निगेटिव्ह अनुभव येतात. जसं की तुमच्यासाठी एखादं काम हे फार महत्त्वाचं असतं, परंतु त्यामध्ये अचानक विलंब होतो. सतत पैशांच्या अडचणी येतात. पती-पत्नीमध्ये काहीही कारण नसताना सतत भांडणं होत राहतात. अनेकदा ऑफिसमध्ये देखील तुम्हाला असेच अनुभव येतात. तुम्ही खूप चांगलं काम करता मात्र तरी देखील तुमचं प्रमोशन रखडतं, पगारवाढ होत नाही. अशा गोष्टी टाळण्यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

ऑफिसमधील डेस्क- फेंग शुईनुसार तुमच्या ऑफिसमधील तुमचा डेस्क हा कधीही ऑफिसच्या मुख्य दरवाजा समोरच असू नये, तो मुख्य दवाराजापासून थोडा दूर असावा, कारण जेव्हा तुमचा डेस्क तुम्ही जिथे बसता ती जागा जर ऑफिसच्या मुख्य दरवाजाजवळ असेल तर अशावेळी मुख्य दरवाजामधून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा थेट तुमच्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे डेस्क मुख्य दरवाजापासून दूर असावा असा सल्ला फेंगशुईमध्ये देण्यात आला आहे.

ऑफिसच्या डेस्कवर रद्दी अनावश्यक कागदपत्रं नसावेत – फेंग शुईशास्त्रानुसार तुमचा डेस्क हा नेहमी स्वच्छ असावा, डेस्कवर नेहमी फक्त कामाच्या वस्तूच असाव्यात अनावश्यक कागदपत्रं किंवा रद्दी तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर असू नये, यामुळे तुमच्या सभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच कामाच्या गतीमध्ये खंड पडतो, अनेक महत्त्वाच्या कामांना विलंब होतो, त्यामुळे कधीही ऑफिसच्या डेस्कवर अनावश्यक कागदपत्रं, रद्दी नसावी, असं फेंग शुईशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

डेस्क नेहमी स्वच्छ असावा – फेंग शुई शास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील तुम्ही जिथे काम करता, तो ऑफिसचा डेस्क नेहमी स्वच्छ असावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. तसेच तुमचंही कामात लक्ष लागतं, त्यामुळे ऑफिसचा डेस्क हा नेहमी स्वच्छ असावा, असं फेंगशुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?