AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर पोर्टवर तुमच्याकडे गांजा सापडला तर किती वर्षांची शिक्षा होते? हा नियम तुम्हाला माहितीये का?

जर समजा एखाद्या व्यक्तीकडे एअर पोर्टवर गांजा आढळून आला तर त्याला काय शिक्षा होऊ शकते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारतामध्ये या संदर्भातील नियम हे अतिशय कडक आहेत.

एअर पोर्टवर तुमच्याकडे गांजा सापडला तर किती वर्षांची शिक्षा होते? हा नियम तुम्हाला माहितीये का?
AirportImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 9:20 PM
Share

विमानातून प्रवास करताना प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक नियमांचं पालन करावं लागतं. एअर पोर्टवर चेक इन पासून ते सिक्योरिटी चेक आणि तुमच्याकडे असलेल्या सामानाच्या तपासणीपर्यंत सर्व नियम हे अत्यंत कडक असतात. अशा स्थितीमध्ये जर एखाद्या प्रवाशाच्या बॅगेत दारू, गांजा या सारखे पदार्थ सापडले तर त्या प्रवाशाच्या अडचणी आणखी वाढू शकतात. भारतामध्ये गांजाशी संबंधित नियम हे खूप कडक आहेत. गांजा खरेदी करणे, तो दुसऱ्या व्यक्तीला विकणे किंवा जवळ बाळगणे हा भारतामध्ये मोठा गुन्हा मानला जातो, त्यासाठी वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तुमच्याकडे कोणत्या अवस्थेमध्ये गांजा सापडला? तो कुठे सापडला? किती प्रमाणात सापडला, यावरून शिक्षेचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं. जर तुमच्याकडे विमानतळावर गांजा आढळून आला तर मग या घटनेचं गांभीर्य आणखी वाढतं. तुमची रवानगी थेट जेलमध्ये होऊ शकते, तुम्हाला काय शिक्षा होणार हे तुमच्याकडे किती गांजा आढळून आला? त्यावर अवलंबून आहे. जर समजा एअर पोर्टवर तुमच्याकडे गांजा आढळून आला तर तुमच्यावर एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कारवाई होते. या कायद्यांतर्गत वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद आहे.

या काद्यांतर्गत गांजाचं वर्गीकरण तीन श्रेणींमध्ये करण्यात आलं आहे. ज्यामध्ये स्मॉल क्वॉलिटी, मध्यम क्वॉलिटी आणि कमर्शिअल क्वॉलिटी असे तीन गट पडतात. जर तुमच्याकडे एक किलो किंवा त्याच्यापेक्षा कमी गांजा आढळून आला तर त्याचा समावेश हा स्मॉल क्वॉलिटीमध्ये होतो. जर तुमच्याकडे वीस किलोपेक्षा अधिक गांजा आढळून आला तर त्याचा समावेश हा कमर्शिअल क्वॉलिटीमध्ये होतो. जर तुमच्याकडे समजा एक किलोपेक्षा जास्त आणि वीस किलोपेक्षा कमी गांजा आढळून आला तर त्याचा समावेश हा मीडियम श्रेणीमध्ये होतो.

काय शिक्षा होऊ शकते

एनडीपीएस कायद्यानुसार जर तुमच्या एक किलोग्राम पर्यंत गांजा आढळून आला तर तुम्हाला एक वर्षांचा सश्रम कारावास किंवा दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. जर तुमच्याकडे एक किलोपेक्षा जास्त आणि वीस किलोग्रामपेक्षा कमी गांजा आढळून आला तर तुम्हाला दहा वर्षांपर्यंत जेलमध्ये जावं लागू शकतं. आणि समजा जर तुमच्याकडे वीस किलोपेक्षा अधिक गांजा आढळून आला तर मात्र तुम्हाला वीस वर्षांपार्यंत जेल होऊ शकते, तसेच दोन लाखांपर्यंत दंड देखील होतो. तसेच गांजा एअर पोर्टवर पकडला गेल्यास एनडीपीएस कायद्याचं कलम 23 आणि 29 अंतर्गत इतरही काही गुन्हे दाखल होतात.

Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?