
अयोध्यात राम मंदिर पुढील वर्षी जानेवारीपासून खुले होणार आहे. या मंदिराचे काम वेगाने सुरु आहे. या मंदिराच्या पहिल्या मजल्याचे फोटो प्रथमच समोर आले आहे. ड्रोन कॅमेऱ्याने हे फोटो घेतले आहे.

पहिल्या मजल्यावर तयार होत असलेले खांब दहा फूट उंच आहे. त्यानंतर त्याच्यावर स्लॅप टाकण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामच्या मंदिराचे हे काम वेगाने सुरु असल्याचे फोटोंमधून दिसून येत आहे.

दुसऱ्या फोटोतून श्रीराम जन्मभूमी मंदिराचा कॉरिडोर दाखवला आहे. हे दोन्ही फोटो उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. ते अनेकांनी रिट्विट केले आहेत.

मंदिराच्या या फोटोंमधून भव्यता आणि सुंदरता दिसून येत आहे. मौर्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंदिराच्या निर्मितीचे काम वेगाने सुरु आहे. जानेवारी 2024 मध्ये भव्य मंदिरात रामलला विराजमान होतील.

राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या मजल्याच्या कामाला वेग आला आहे. मंदिराच्या इतर भागांचे काम सुरु आहे. तसेच मंदिराच्या चारही बाजूला कॉरिडोर तयार केले जात आहे.