Ramayana Box Office Collection : आज रिलीज होणारे दोन चित्रपट, ‘रामायण’ च्या 2000 कोटी कमाईच्या स्वप्नावर फिरवू शकतात पाणी

Ramayana Box Office Collection : सध्या सर्वत्र ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांची मुख्य भूमिका असलेला भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. उत्पन्नामध्ये देशातील नंबर 1 चित्रपट बनण्याचं रामायणचं टार्गेट आहे. जगभरात 2070 कोटींपेक्षा जास्तची कमाई करुन 'दंगल' चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्याचं लक्ष्य आहे.

| Updated on: Nov 27, 2026 | 6:30 AM
1 / 5
रिलीज झाल्यापासून 22 दिवस थिएटरमध्ये या चित्रपटाचा मार्ग मोकळा होता. या चित्रपटाला कुठल्याही दुसऱ्या मोठ्या फिल्मकडून आव्हान मिळालं नाही. सर्व स्क्रिन्स याच चित्रपटाला मिळाल्या. सर्व कमाई सुद्धा याच चित्रपटाची झाली. पण आता दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. याचा 'रामायण'च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.

रिलीज झाल्यापासून 22 दिवस थिएटरमध्ये या चित्रपटाचा मार्ग मोकळा होता. या चित्रपटाला कुठल्याही दुसऱ्या मोठ्या फिल्मकडून आव्हान मिळालं नाही. सर्व स्क्रिन्स याच चित्रपटाला मिळाल्या. सर्व कमाई सुद्धा याच चित्रपटाची झाली. पण आता दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. याचा 'रामायण'च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.

2 / 5

ज्या दोन चित्रपटांबद्दल बोलतोय त्यातला एक चित्रपट आहे सूरज बडजात्याचा ‘ये प्रेम मोल लिया’. आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. दुसरी फिल्म आहे इमरान हाशमीची 'गनमास्टर जी9’. आदित्य दत्तने हा चित्रपट डायरेक्ट केला आहे. हे दोन्ही चित्रपट आज 27 नोव्हेंबरला रिलीज होणार आहेत.

3 / 5

‘रामायण’ एक मोठा चित्रपट आहे यात अजिबात शंका नाही. पण आयुष्मान खुरानाचे चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर चालतात. दुसराचित्रपट आहे इमरान हाशमीचा 'गनमास्टर जी9'. इमरानचा मागचा चित्रपट ‘आवारापन 2’ याचवर्षी ऑगस्ट मध्ये रिलीज झालेला. या चित्रपटाने 200 कोटींपेक्षा जास्तची कमाई केलेली.

4 / 5

त्यामुळे इमरानचा 'गनमास्टर जी9' सुद्धा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. ट्रेलर आल्यापासून या दोन चित्रपटांची सुद्धा तितकीच चर्चा आहे. हे दोन चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘रामायण’च्या स्क्रीन कमी होतील. त्यामुळे ‘रामायण’ चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल.

5 / 5

‘रामायण' चित्रपटाने 21 दिवसात भारतात 1180.78 कोटीची (ग्रॉस) कमाई केली आहे. जगभरातील कमाई मिळून हा आकडा 1755 कोटी होतो. म्हणजे 'दंगल' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ‘रामायण' ला अजून 315 कोटींची गरज आहे. तिसऱ्या सोमवारी या चित्रपटाच्या कमाईत बऱ्यापैकी घसरण झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us