या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत कमावले तब्बल 1100 कोटी रुपये; बजेटच्या दहा पटींनी अधिक नफा, दिग्दर्शक फक्त 20 वर्षांचा

या हॉरर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जेव्हा या चित्रपटावर काम सुरू झालं, तेव्हा त्याचा दिग्दर्शक फक्त 16 वर्षांचा होता. आता तो वीस वर्षांचा असून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणाऱ्या चित्रपटाचा सर्वांत तरुण दिग्दर्शक ठरला आहे.

| Updated on: Jun 04, 2026 | 11:36 AM
1 / 5
शुक्रवारी 29 मे रोजी 'बॅकरुम्स' हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रविवारपर्यंत तब्बल 118 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1127 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा दिग्दर्शक केन पार्सन्स हा फक्त 20 वर्षांचा आहे. केन याआधी एक युट्यूबर म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. 'बॅकरुम्स' हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.

2 / 5
'क्रिपीपास्ता' (Creepypasta) या इंटरनेटवरील लोकप्रिय हॉरर दंतकथांकडे केन आकर्षित झाला होता. यांचं कथानक नेहमी मॉल्स आणि दुकानांच्या मागे असलेल्या कायम ओसाड, निर्मनुष्य आणि भुताटकीच्या जागांभोवती फिरत होतं. केनने याच कल्पनेभोवती एक कथा विणली आणि 'बॅकरुम्स' नावाची एक व्हिडीओ सीरिज तयार केली.

3 / 5
आज केनच्या युट्यूब सीरिजच्या पहिल्या भागाला तब्बल 84 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'स्ट्रेंजर थिंग्ज'चे कार्यकारी निर्माते  शॉन लेव्ही यांच्या प्रॉडक्शन कंपनीतील एका तरुणाने युट्यूबवर 'बॅकरुम्स' पाहिला. त्याने हा विषय पुढे नेला आणि त्यानंतर शॉनने त्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्यास सहमती दर्शवली.

4 / 5
'सॉ', 'इन्सिडियस', 'द कॉन्जरिंग युनिव्हर्स' यांसारख्या हॉरर चित्रपटांचे निर्माते जेम्स वॅन नंतर या प्रोजेक्टमध्ये निर्माता म्हणून सहभागी झाले. 'व्हरायटी'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "केनशी बोलण्यापूर्वी तो हायस्कूलचा विद्यार्थी आहे याची आम्हाला कल्पना नव्हती." अखेर हा चित्रपट फक्त 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 95 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला.

5 / 5
या हॉरर चित्रपटामागे शॉन लेव्ही आणि जेम्स वॅन यांसारख दिग्गज निर्माते असण्याचा आणखी एक मोठा फायदा झाला. तो म्हणजे ऑस्करसाठी नामांकित झालेले दोन हॉलिवूड अभिनेते चिवेटेल इजिओफोर आणि रेनेट रेन्सवे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी होकार दिला. पहिल्या चर्चेपासून ते चित्रपट साकार होईपर्यंत चार वर्षांचा अवधी लागला. तरी पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने बजेटपेक्षा दहा पटींहून अधिक कमाई केली आहे.

Follow Us