
महत्त्वाचं म्हणजे अनेकांच्या मनावर राज्य करणारी राम्या कृष्णन आणि दिग्दर्शक एस रविकुमार यांच्या अफेअरचं सत्य फार कमी लोकांना माहिती आहे. राम्या कृष्णन आणि के एस रविकुमार यांनी एका पाठोपाठ अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीने १९९९ साली प्रदर्शित झालेल्या 'पदयप्पा' आणि 'पत्तली' या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

'पदयप्पा' आणि 'पत्तली' सिनेमांना भरपूर यश मिळाल्यानंतर २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'पंचतंत्र' सिनेमात रविकुमार यांनी अभिनेत्रीला एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आणलं. रिपोर्टनुसार अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम करत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण तेव्हा रविकुमार विवाहित होते.

रिपोर्टनुसार दोघांना अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं. पण जेव्हा दिग्दर्शकाच्या पत्नीला दोघांच्या अफेअरबद्दल कळालं तेव्हा रविकुमार यांच्या पत्नीने अभिनेत्रीला खडसावलं. डेट करत असताना अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. अशात रविकुमार आणि त्यांच्या पत्नीमध्ये देखील अनेक वाद होवू लागले.

अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर दिग्दर्शक रविकुमार यांनी नातं संपवण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने दिग्दर्शकाकडून अबॉर्शनसाठी तब्बल ७५ लाख रुपये मागितल्याची चर्चा तुफान रंगली. अशात एकदा अभिनेत्री राम्या कृष्णनला रविकुमार यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल आणि प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा रंगणाऱ्या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं अभिनेत्री सांगितलं.

त्यानंतर अभिनेत्री राम्या कृष्णन आणि निर्माते कृष्णा वामसी यांनी २००३ मध्ये लग्न केलं. दोघांचं लग्न १२ जून २००३ साली झालं. लग्नानंतर अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव रित्विक कृष्णा असं आहे. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहे.