
Bajaj Pulsar N125 चे डिझाईन सुपरमोटार्डपासून प्रेरित आहे. ही बाईक दिसायला एकदम खास आणि आकर्षक आहे. लाईटवेट असल्याने ही बाईक वाहनांच्या गर्दीत एकदम हटके दिसते.

Pulsar N125 मध्ये तुम्हाला 124.58 सीसीचे इंजिन मिळते. 8500 आरपीएम श्रेणीत ते सर्वश्रेष्ठ 12 पीएस पॉवर आणि 6000 आरपीएम वर 11 एनएम टॉर्क देते.

Pulsar N125 मध्ये डिजिटल एलसीडी कंसोल आहे. या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी, कॉल रिसिव्ह करणे आणि हटविणे, मॅसेज अलर्ट सारख्या सुविधा देते.

या बाईकमध्ये दोन व्हेरिएंट आहे. यामध्ये एलईडी डिस्क बीटी व्हेरिएंट आणि एलईडी डिस्क व्हेरिएंटचा सहभाग आहे. ही बाईक अनेक अकर्षक रंगात उपलब्ध आहे.

Bajaj Pulsar N125 ची किंमत 94,707 रुपयांपासून सुरु होते.