Bank Loan : सरकारी बँकेच्या व्याजदरात मोठी कपात, रेपो रेट कमी होताच मोठी अपडेट समोर!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण निर्धारण समितीने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता एका सरकारी बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

| Updated on: Dec 07, 2025 | 9:24 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीत नेमकं काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अनेकजण रेपो रेट कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा करत होते. हा दावा खरा ठरला आणि रेपो रेट कमी करण्यात आला.

2 / 5
 भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर गृहकर्ज, वाहन कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे. या निर्णयाचा फायदा आता देशभरातील सामान्यांना होणार आहे.

3 / 5
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. त्यानंतर आता सध्याचा रेपो रेट 5.25 पर्यंत कमी केला आहे. हा निर्णय होताच आता बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. या बँकेने आरएलएलआरशी संबंधित असलेल्या व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे.

4 / 5
बँक ऑफ महाराष्ट्रच्या या निर्णयामुळे आता या बँकेचे होम लोन, कार लोन आणि शैक्षणिक कर्जाचा व्याजदर कमी होणार आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे होम लोन 7.10 टक्के व्याजदराने आणि कार लोन 7.45 टक्के व्याजदराने दिले जाईल.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)