

ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला. वयाच्या अवघ्या 21 वर्षी म्हणजेच 1994 मध्ये तिनं मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

त्यानंतर तिनं स्वत:च्या मनमोहक सौंदर्यानं आणि कसदार अभिनयाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही विशेष जागा बनवली.

वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अनेक चाहत्यांनी तिच्यासाठी फार मोठ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. काहींनी तर ती जगातील सर्वात सुंदर महिला असल्याची उपमा दिली आहे.

तर अनेकांनी ऐश्वर्याच्या स्मित हास्याची प्रशंसा केली आहे.

ऐश्वर्यानं बॉॉलिवूडमध्ये दोन दशकांपेक्षा जास्त वेळ घालवला. आजही लोकांमध्ये ऐश्वर्यासाठी प्रेम कायम आहे.

सोशल मीडियावरुन मिळत असलेल्या शुभेच्छांवरुन तिच्या चाहत्यांचं तिच्यावर असलेलं प्रेम दर्शवत आहेत.