सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? ‘बेड टी’च्या सवयीमुळे शरीरावर होतात 5 गंभीर परिणाम
सकाळी उठताच चहा पिण्याची सवय अनेकांना असते. पण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी, अपचन, पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 'बेड टी'चे शरीरावर नेमके काय परिणाम होतात आणि चहा पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या.

अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटातील आम्लाचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास जाणवू शकतो.
चहातील कॅफीन आणि इतर घटकांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही लोकांना पोट साफ न होणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो.
सकाळी उठताच साखरयुक्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने तोंडातील बॅक्टेरिया आम्ल तयार करू शकतात. यामुळे दातांच्या इनॅमलवर परिणाम होण्याची शक्यता असते.
रिकाम्या पोटी दूध घातलेला चहा किंवा कॉफी प्यायल्याने काही जणांना पोट फुगणे, अस्वस्थता किंवा गॅसचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे कधी कधी प्रचंड त्रास होऊन रुग्णालयही गाठावे लागू शकते.
चहा किंवा कॉफी जेवणानंतर 1 ते 2 तासांनी घेणे योग्य ठरू शकते. सकाळी उठल्यावर चहाऐवजी कोमट लिंबूपाणी, आवळा रस किंवा रात्रभर भिजवलेले मेथी, जिरे अथवा बडीशेपचे पाणी घेण्याचा सल्ला दिला जातो.