IPL 2023 स्पर्धेपूर्वी विराट कोहली याने हातावर असं काही गोंदवलं, त्याचा नेमका अर्थ काय?

| Updated on: Mar 25, 2023 | 4:50 PM

आयपीएल 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आरसीबी संघ 16 वं पर्व आपल्या नावावर करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. यासाठी विराट कोहलीही सज्ज आहे. पण तत्पूर्वी विराट कोहलीच्या हातावरील नव्या टॅटूने लक्ष वेधलं आहे.

1 / 5
विराट कोहलीला क्रिकेटमध्ये चांगलीच लय सापडली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली. असं असलं तरी विराट कोहली त्याच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखला जातो. (PC-PTI)

2 / 5
मुंबई एअरपोर्टवर विराट कोहलीचा वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाला. त्याने त्याच्या उजव्या हातावर टॅटू गोंदवल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे त्याच्या नव्या टॅटूची चर्चा रंगली आहे.(PC-PTI)

3 / 5
विराट कोहलीने हा टॅटू वनडे मालिकेनंतर तयार केला आहे. या सीरिजमध्ये विराटच्या हातावर टॅटू नव्हता. त्यात गुरुवारी एका अवॉर्ड शोमध्ये कोहली कोट घालून गेला होता. त्यामुळे ही बाब उघड झाली नाही. (PC-Twitter)

4 / 5
विराट कोहलीच्या शरीरावर यापूर्वी 11  टॅटू होते. त्यात आई वडिलांचं नाव, टेस्ट आणि वनडे कॅपचा नंबर, गॉड आय, जॅपनीस सामुराई, भगवान शिव, वृश्चिक राशीचं चिन्ह, ट्रायबल टॅटू आणि ओम गोंदवला आहे.(PC-Twitter)

5 / 5
कोहलीच्या नव्या टॅटूचा अर्थ अजून उमगलेला नाही. पण या नव्या टॅटूसह विराट कोहली बंगळुरूला रवाना झाला आहे. इंडियन प्रीमियर लीगचं 16 वं पर्व 31 मार्च 2023 पासून सुरु होणार आहे. (PC-Twitter)