
बर्म्युडा ट्रायंगल हा गेल्या काही वर्षांपासून कुतुहलाचा,नवलाईचा, पुन्हा पुन्हा वाचण्याचा विषय आहे. त्याविषयीची उत्सुकता आजही कायम आहे. अजूनही विज्ञानाच्या वाटा येथे येऊन थिट्या झाल्या आहेत. ती विमानं, जहाजं कुठं गायब झाली आणि त्यांची सांगडे समुद्राच्या पोटात कुठं गेली या रहस्यावरून अद्याप पडदा उठलेला नाही.

बर्म्युडा ट्रँगल ही उत्तर अटलांटिक समुद्रातील ब्रिटनजवळील क्षेत्र आहे. हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मियामीपासून 1770 किलोमीटर, तर कॅनाडाच्या दक्षिण भागापासून 1350 किलोमीटर अंतरावर आहे.

अनेक तज्ज्ञांचा आणि खलाश्यांचा असा दावा आहे की हे एलियन्सचे बेस स्टेशन आहे. येथे त्यांचा पृथ्वीवरील तळ आहे. येथूनच एलियन्सच्या युएफओ या अंतराळात झेपावतात आणि याच तळावर मध्यरात्री विसवतात.

1492 मध्ये अमेरिकेचा शोध घेणाऱ्या क्रिस्टोफर कोलंबसने त्याच्या डायरीत एक विचित्र घटना नोंदवली आहे. त्याच्या मते, त्याला समुद्री प्रवास करताना आकाशातून अनेक दिवे थेट समुद्रात घुसताना दिसले.

ही घटना घडली तेव्हा कोलंबस बर्म्युडा ट्रँगलजवळ होता. त्याचे होकायंत्रही त्यावेळी काही काळ काम करत नव्हते. त्याला हा अजबच प्रकार वाटला. ही काही भुताटकी तर नाही ना, असे त्याला वाटले. आता या लाईट्सला युएफओ असे म्हटले जाते. ते एलियन्सचे यान असल्याचा दावा करण्यात येतो.

शास्त्रज्ञांच्या मते, बर्म्युडा ट्रँगल या परिसरात चुंबकीय लहरी प्रमाणपेक्षा कित्येक पट अधिक आहे. या भागात 250 किलोमीटर वेगाने वारा वाहतो. येथील समुद्रात जवळपास 50 फूट लाटा उसळतात. त्या फटक्यात जहाजं आणि विमानं गायब होतात.