Business Ideas: झोपेतही कमवा! 5 ऑनलाईन व्यवसाय जे विना मालक चालतात 24 तास

Passive Income Ideas: नोकरीतील ताणामुळे कंटाळलात? बॉसच्या कटकटीने वैतागलात? आकाशाला अंत नाही हे लक्षात ठेवा आणि या ऑनलाईन व्यवसायात उतरा. विना मालक 24 तास चालतात. तुमची कमाई होते. कोणते आहेत ते बिझनेस?

| Updated on: Nov 30, 2025 | 2:38 PM
1 / 6
Best Online Business: हे इंटरनेटचे युग आहे. येथे आता प्रत्येक गोष्ट जवळ आणि अगदी चुटकीसरशी तयार मिळते. कमी कष्टात, स्मार्टली तुम्ही कमाई करू शकतात. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. नोकरीला कंटाळला असाल. नवीन काही करण्याचा पर्याय शोधत असाल तर असे व्यवसाय जे तुम्हाला भरपाई कमाई करून देतील. येथे तुम्हीच तुमचे बॉस आणि तुम्हीच तुमचे नोकर आहात. कोणतेही आहेत हे व्यवसाय?

2 / 6
ड्रॉपशिपिंग (Dropshipping): विना कोणताही माल खरेदी करता तुम्ही ई-कॉमर्स करु शकता. शॉपिंग वेबसाईटच्या मदतीने तुम्ही स्टॉक, डिलिव्हरी वा स्टोरेजच्या चिंतेविना तुम्ही   ड्रॉपशिपिंग हा ऑनलाईन व्यवसाय करू शकता.  Shopify वा WooCommerce सारख्या प्लॅटफॉर्मवर एक ऑनलाईन स्टोअर सुरु करावे लागेल. तिथे उत्पादनाची यादी असते. त्यातील योग्य उत्पादनांची यादी तुमच्या साईटवर घ्यावी लागेल. जेव्हा ग्राहक ऑर्डर करतो. तेव्हा थर्डपार्टी वितरक माल पाठवतो आणि कमिशन तुमच्या खात्यात जमा होते.

3 / 6
ई-बुक,डिजिटल मार्केटिंग कोर्स: तुम्ही अर्थशास्त्र, फिटनेस, शिक्षण, व्यक्तिमत्व विकास यासारख्या एखाद्या कौशल्यात पारंगत असाल तर मग  एक ई-बुक वा डिजिटल कोर्स तयार करुन तो विक्री करु शकता. त्यातून चांगली कमाई होऊ शकते.  Notion, Canva वा Google Docs च्या मदतीने तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट तयार करता येईल. Gumroad, Payhip वा Udemy सारख्या प्लॅटफॉर्मवर ते विक्री करता येईल.

4 / 6
Affiliate Marketing: ॲफिलिएट मार्केटिंग सध्या चर्चेत आहे. कमी वेळेत अधिक कमाईचे हे मोठे साधन मानल्या जाते. तुमच्या ब्रॅड्सची लिंक तुम्हाला ब्लॉग, युट्यूब चॅनल, सोशल मीडिया अथवा WhatsApp ग्रुपवर शेअर करावी लागते. त्या लिंकवरून कोणी शॉपिंग केली तरी मग तुम्हाला कमिशन मिळते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वा इतर ई कॉमर्स साईटवरून चांगले कमिशन मिळते.

5 / 6
डिझायनिंग: तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर मग डिझायनिंगमध्ये चांगला व्यवसाय उभारू शकता. टी-शर्ट डिझाईन, पोस्टर, कॉफी मगवर प्रिंट करून देऊ शकता. तुम्ही हटके डिझाईन  प्रिंटिफाई (Printify), जॅजल (Zazzle) वा टीस्प्रिंग (Teespring) सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करून कमाई करु शकता. Canva सारख्या टूल्सच्या मदतीने हे काम अगदी काही मिनिटांत पूर्ण करता येईल.

6 / 6
छायाचित्रकार: जर तुम्ही फोटोग्राफर, संगितकार, व्हिडिओग्राफर असाल तर Shutterstock, Adobe Stock, वा Pixabay सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचे कौशल्य, प्रतिभा दाखवू शकता. येथे तुमचे फोटो, संगीत, व्हिडिओ लोकांना आवडले. तर त्यावर चांगली कमाई होऊ शकते. रॉयलिटीच्या रुपाने चांगला पैसा मिळू शकतो. AI-टूल्स वा मोबाइलच्या मदतीने कंटेंट विक्री करू शकता.