Poultry Farm : फक्त या दोन कोंबड्या पाळा, पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचा फायदा, वर्षाला देतात 300 अंडी!

| Updated on: Nov 18, 2026 | 8:25 PM
1 / 5
अनेक शेतकरी हे शेतीसोबतच इतरही शेतीपुरक व्यवसाय करतात. या व्यवसायांमध्ये पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन हा सर्वाधिक परवडणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

अनेक शेतकरी हे शेतीसोबतच इतरही शेतीपुरक व्यवसाय करतात. या व्यवसायांमध्ये पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन हा सर्वाधिक परवडणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

2 / 5

आजघडीला देशभरात लाखो शेतकरी या व्यवसायात उतरले आहेत. हा व्यवसाय उभारताना कमी जागा लागते. सोबतच खर्चही परवडतो. कुक्कुटपालन करून अंडी, मांस विक्री करता येते. चांगल्या जातीच्या कोंबड्या असतील तर चांगला नफा मिळतो.

3 / 5

लवकर वाढ होणाऱ्या तसेच भरपूर अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या दोन प्रजाती खूप प्रसिद्ध आहेत. यातील पहिली प्रजाती ही व्हाईट लेगहॉर्न आहे. दुसऱ्या प्रजातीचे नाव रोड आयलँड रेड असे आहे.

4 / 5

व्हाईट लेगहॉर्न जातीची कोंबडी 20 आठवड्यात अंडे देण्यास सुरुवात करते. तिला पोषणासाठी रोज 110 ते 140 ग्रॅम जेवण लागते. ही कोंबडी वर्षभरात साधारण 280 ते 350 अंडी देते.

5 / 5

तर रोड आयलँड रेड या जातीची कोंबडी वर्षभरात 200 ते 250 अंडी देते. व्यावसायिक पोल्ट्री फार्मसाठी व्हाईट लेगहॉर्न ही कोंबडी सर्वाधिक चांगली मानली जाते. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us