
काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर 'पारू' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अवघ्या काही दिवसांतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे. हा अभिनेता मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

'पारू' मालिकेत सर्वांचा लाडका अभिनेता भरत जाधवने एण्ट्री केली आहे. यामध्ये भरत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. भरतच्या एण्ट्रीचा खास प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये त्याचा वेगळाच लूक पहायला मिळतोय.

मालिकेतील भरतच्या भूमिकेचं नाव सूर्यकांत कदम असं आहे. त्याचा लूक जितका दमदार आहे तितकीच जबरदस्त त्याची भूमिका आहे. अहिल्यादेवींच्या आयुष्यात उलथापालथ करण्यासाठी सूर्यकांतची एण्ट्री झाली आहे.

दुसरीकडे पारू आपल्या निरागस स्वभावाने सगळयांना ग्रामीण जीवनाचा आनंद घ्यायला शिकवत आहे. यासाठी तिने आदित्य आणि प्रितमला गावच्या वेशात तयार केलंय. आदित्य ही पारूला हरीषसाठी प्रेमाची दारं उघडायला सांगतोय.

मालिकेत येताच सूर्यकांत कदमने त्याचा पहिला डाव खेळला आहे. त्याने श्रीकांतला गायब केलंय. अहिल्याला घरावरचा धोका समजतो. अहिल्यासमोर सूर्यकांत एक करार ठेवतो. हा करार काय आहे आणि त्यामुळे अहिल्यासमोर कोणतं नवं संकट येणार, हे मालिकेचाय आगामी भागात पहायला मिळेल.