Bhaubeej Gift Ideas : भाऊबीजेसाठी बहिण-भावाला द्या हटके आणि ट्रेंडी गिफ्ट्स; स्मार्टवॉचपासून पर्सनलाइज्ड गिफ्ट्सपर्यंत, पाहा खास आयडिया!

दरवर्षी पाकीट किंवा मिठाई देण्याऐवजी यंदा भावंडांना त्यांच्या आवडीनुसार खास भेट द्या. तुमच्या बजेटनुसार आणि त्यांच्या आवडीनुसार ही गिफ्ट तुम्ही देऊ शकता.

| Updated on: Nov 10, 2026 | 5:11 PM
1 / 9
भाऊबीजेसाठी बहिण आणि भावाला दरवर्षी काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न आपल्याला दरवर्षी पडतो. मग काय गुगलवर आयडिया बघतो नाहीच आवडली तर शेवटी पाकीटच भरतो. पण थांबा यंदा काहीतरी नवीन हटके किंवा ट्रेंडी गिफ्ट द्या. खाली दिलेल्या आयडियांपैकी तुम्हाला काय आवडतंय द्यायला ते पाहा.

भाऊबीजेसाठी बहिण आणि भावाला दरवर्षी काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न आपल्याला दरवर्षी पडतो. मग काय गुगलवर आयडिया बघतो नाहीच आवडली तर शेवटी पाकीटच भरतो. पण थांबा यंदा काहीतरी नवीन हटके किंवा ट्रेंडी गिफ्ट द्या. खाली दिलेल्या आयडियांपैकी तुम्हाला काय आवडतंय द्यायला ते पाहा.

2 / 9

स्मार्ट वॉच किंवा फिटनेस बँड :तुमचा भाऊ किंवा बहीण फिटनेस फ्रिक असतील तर त्यांच्यासाठी स्मार्टवॉच हा पर्याय एकदम बेस्ट आहे. यामध्ये चालण्याची पावलं, झोपेची माहिती, हृदयाचे ठोके आणि मोबाईसवरील नोटीफिकेशन्सही पाहता येतात.

3 / 9

वायरलेस इअरबड्स : गाणी ऐकायला किंवा प्रवासात फोनवर मू्व्ही बघायला आवडणाऱ्या भावंडांसाठी वायरलेस इअरबड्स उत्तम गिफ्ट ठरू शकते. वेगवेगळ्या किमतीमध्ये उपलब्ध असलेल्या या गिफ्टमध्ये बॅटरी, आवाजाची गुणवत्ता आणि नॉईड कॅन्सलेशन यांसारख्या गोष्टी पाहून निवड करता येते.

4 / 9

पर्सनलाईज्ड फोटो फ्रेम किंवा मेमरी बॉक्स : लहानपणीचे फोटो,एकत्र घालवलेले क्षण आणि जुन्या आठवणी यांची मजाच वेगळी असते. अशा आठवणी एकत्र करून फोटो फ्रेम, स्क्रॅपबुक किंवा मेमरी बॉक्स तयार करता येईल. त्यात तुम्ही एखादी मनातलं बोलणारी चिठ्ठी देखील ठेवू शकता.

5 / 9

बहिणीसाठी सेल्फ केअर हॅम्पर :बहिणीला स्किनकेअर किंवा स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरायला आवडत असतील तर तिच्यासाठी परफ्यूम, लिप बाम, बॉडी लोशन, फेस मास्क, हेअर केअर उत्पादने देऊ शकता.

6 / 9

भावासाठी ग्रुमिंग किट :भावाला स्वत:च्या लूककडे लक्ष द्यायला आवडत असेल,तर ग्रुमिंग किट हा उपयोगी पर्याय आहे. त्यात फेसवॉश, मॉईश्चरायझर, परफ्यूम, दाढी करण्यासाठी लागणारी उत्पादने किंवा हेअर स्टायलिंगसाठीच्या वस्तू देता येतील.,

7 / 9

फॅशन अॅक्सेसरीज :बहिणीसाठी सुंदर इअरिंग्स, पेंडंट, ब्रेसलेट, हँडबॅग किंवा घड्याळ निवडता येतील. तर भावासाठी वॉलेट, सनग्लासेस, बेल्ट, घड्याळ किंवा स्टायलिश बॅकपॅक हा पर्याय आहे

8 / 9

गेमिंग अॅक्सेसरीज :तुमच्या भावाला गेमिंगची आवड असेल तर त्याच्यासाठी गेमिंग माऊस, कीबोर्ड हेडसेट किंवा कंट्रोलर भेट देऊ शकता.

9 / 9

पुस्तकं आणि डिजीटल सबस्क्रिप्शन :वाचनाची आवड असलेल्या भावंडांसाठी त्यांच्या आवडत्या लेखकांचं पुस्तक, कादंबरी किंवा माहितीपूर्ण पुस्तक देता येईल. याशिवाय ऑडिओबुक किंवा डिजीटल वाचन प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शनही एक वेगळं गिफ्ट ठरू शकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us