
कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बहीण- भावाच्या नात्यातील आपुलकी जपणारा सण म्हणून याकडे पाहिले जाते. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्यात भाऊ बहिणीला ओवाळणी देतो, तसेच बहिणही भावाला गिफ्ट देते.

भाऊबीज म्हटलं की बहिणींना एक वेगळाच उत्साह असतो. भाऊबीजेच्या निमित्ताने जर तुम्हीही तुमच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्याचा विचार करत असाल, तर मग काही सुंदर डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करु शकता.

तुम्ही मनगटावर मोराची नक्षी असलेली मेहंदीची डिझाईन नक्की काढू शकता. यात एका बाजूला साधे डिझाईन पाहायला मिळत आहे. तर बाकीच्या हातावर पाने आणि कमळाच्या फुलाची डिझाईन पाहायला मिळत आहे.

सध्या मोराची नक्षी असलेल्या मेहंदीच्या डिझाईनची खूप चर्चा आहे. त्यासोबतच जाळी, लहान घंटा, कमळाचे फूल याचे डिझाईन वापरून तुम्ही वेगळी मेहंदी काढू शकता.

सध्या मेहंदीच्या 3D डिझाइनचीही चर्चा आहे. यात हातावर कमळ आणि मोर काढले आहेत. मनगटावरही 3D कमळाचे फूल आहे. सोबतच एका बाजूला जाळी आणि बोटांवर पानांचे डिझाईन काढले आहे.

हत्ती आणि कमळाचे कॉम्बिनेशन असलेले मेहंदीचे डिझाइनही खूप सुंदर दिसते. यात दोन्ही हातांवर मोर आणि कमळाच्या फुलाचा थ्री डी डिझाईन टाकला आहे. मनगटावर हत्ती आणि कमळाचे साधे डिझाईन काढले आहे.

जर तुम्हाला भरलेली मेहंदी नको असेल, तर हा दोन्ही हातांवर गोल वर्तुळ बनवून आजूबाजूला साध्या फूल आणि पानांची नक्षी काढू शकता. तसेच मनगटावरही साधी डिझाईन काढून तुम्ही ती आकर्षक बनवू शकता.

संपूर्ण भरलेली मेहंदी खूपच सुंदर दिसते. यात तुम्ही मोर, कमळ, फूल, जाळी तसेच विविध थ्री डी डिझाईन काढून त्या तुम्ही सहज कॉपी करु शकता. जर तुम्हाला वेलीच्या आकाराची मेहंदी आवडत असेल, तर तुम्ही ते काढूनही उत्तम डिझाईन करु शकता.

जर तुम्ही खास भाऊबीजसाठी मेहंदी काढत असाल तर ही भरलेली मेहंदी डिझाईन नक्की ट्राय करा. यात दोन्ही हातांवर जाळी आणि फुलांचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. दोन्ही हातांवर 3D नक्षीही आहे, जी खूप सुंदर दिसते.

जर तुमच्या घरात कोणाला मेहंदी काढता येत असेल, तरीही तुम्हाला मेहंदी काढायची असेल तर हा पर्याय फारच सोपा आहे. वेलीच्या आकार स्टाईलचा डिझाईन लहान मुलांच्या हातावर लावण्यासाठीही सर्वात बेस्ट आहे.