
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील इंदौर यथील महू छावणीतील दलित कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील रत्नागिरीतील जिल्ह्यातील मंडणगड येथील आंबवडे गावचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आजोबांचे नाव मालोजी सकपाळ होते.

बाबासाहेबांना लहानपणी भीमराव, एकपाल या नावाने बोलवले जात होते. त्यांचे वडील रामजी लष्करात कार्यरत होते. वडील रामजी कबीर पंथाचे अनुयायी होते. तर आई भीमाबाईला धार्मिकवृत्ती जपणारी गृहिणी होती.

भीमराव आपल्या आईवडिलांचे 14 वे अपत्य होते 11 मुली व 3 मुलांचा समावेष होता. भीमराव यांच्या पूर्वी जन्मलेल्या 13 भावंडांपैकी केवळ बलराम, आनंदराव , मंजुळा व तुळसा एवढेच जिवंत होते. तर इतर भावंडांचा अकाली मृत्यू झाला होता .

20 नोव्हेंबर 1896मध्ये त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले , त्यावेळी ते केवळ 5 वर्षाचे होते. त्यानंतर त्यांची आत्या मीरा यांनी भीमराव यांच्यासह त्यांच्य भावंडांचा सांभाळा केला. लहानपणा पासूनच भीमराव अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांच्या कुशाग्र बुद्धीमतेवर खुश होवून त्यांच्या शिक्षकाने त्याना आंबेडकर हे उपनाव दिले.

सन 1908 मध्ये वयाच्या 17 व्य वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाहाच्या वेळी त्याच्या पत्नी रमाबाई यांचे वय अवघे 14 वर्ष होते. लग्नानंतर भीमराव यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. उच्चशिक्षित होऊन भारतात परत त्यांनी स्वतःला देशसेवेला वाहून घेतले.