AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMAT 2025: अभिषेक शर्माने पुन्हा 182 च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा, स्पर्धेत 26 षटकारांसह गाठला 300 चा आकडा

सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत अभिषेक शर्माने आक्रमक खेळीचं दर्शन घडलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे सामन्याचं रूपडं पालटून जातं. सर्विसेजविरुद्धच्या सामन्यातही त्याची बॅट तळपली. सर्वाधिक षटकारांची नोंदही केली आहे.

SMAT 2025: अभिषेक शर्माने पुन्हा 182 च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा, स्पर्धेत 26 षटकारांसह गाठला 300 चा आकडा
SMAT 2025: अभिषेक शर्माने पुन्हा 182 च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा, स्पर्धेत 26 षटकारांसह गाठला 300 चा आकडा Image Credit source: PTI
| Updated on: Dec 06, 2025 | 6:58 PM
Share

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अभिषेक शर्माचा झंझावात सुरुच आहे. पंजाब संघाची धुरा हाती असून आक्रमक खेळी करताना मागे पुढे पाहात नाही. पंजाब विरुद्ध सर्विसेज सामन्यात अभिषेक शर्मान आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सर्विसेजने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अभिषेक शर्मा हा प्रभसिमरन सिंह सलामीला आला. खेळपट्टीवर तग धरत नाही तोच अभिषेक शर्माने आक्रमक बाणा दाखवला. समोर जो गोलंदाज येईल त्याच्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन सिंह 28 चेंडूत 50 दावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्माने 34 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 3 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 182.35 चा होता. तीन षटकारांसह अभिषेक शर्मा सिक्सर किंग ठरला आहे.

पाच गोलंदाजांची केली धुलाई

अभिषेक शर्माने सर्विसेजच्या पाच गोलंदाजांचा सामना केला. या पाचही गोलंदाजांना त्याने आक्रमक खेळी केली. विशाल गौरला 7 चेंडू 12, एसएम राठीला 4 चेंडूत 8, अभिषेकला 8 चेंडूत 16, पुलकित नारंगला 12 चेंडूत 22 आणि रवि चौहानला 3 चेंडूत 5 धावा मारल्या. अभिषेक शर्माने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक षटकारांची नोंद केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात त्याने सर्वाधिक 26 षटकार मारले आहे. आयुष म्हात्रे 25 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर सर्वाधिक धावांच्या यादीत अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.

अभिषेक शर्माने सहा सामन्यात 26 षटकारांसह 304 धावा केल्या आहेत. तर आयुष म्हात्रेने 6 सामन्यात 325 धावा केल्या आहेत. या पर्वात अभिषेक शर्माची सर्वोत्तम धावसंख्या ही 148 आहे. अभिषेक शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी दिलासादायक बाब आहे. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाच सामन्याची टी20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत अभिषेक शर्मा संघाचा भाग आहे. तर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दृष्टीने त्याचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे.

पंजाबने 20 षटकात 6 गडी गमवून 233 धावा केल्या आहेत आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं आहे. अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह यांच्या व्यतिरिक्त नमन धीर याने आक्रमक खेळी करत अर्धशतक ठोकलं. त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार मारत 54 धावा केल्या

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान