AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMAT 2025: अभिषेक शर्माने एकट्याने फिरवला सामना, 377 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल

देशांतर्गत टी20 स्पर्धा अर्थात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील दिग्गज खेळाडू खेळत आहे. असं असताना अभिषेक शर्माने या स्पर्धेत कहर केला आहे. फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली आहे.

SMAT 2025: अभिषेक शर्माने एकट्याने फिरवला सामना, 377 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल
SMAT 2025: अभिषेक शर्माने एकट्याने फिरवला सामना, 377 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमालImage Credit source: PTI
| Updated on: Dec 04, 2025 | 10:20 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. अवघ्या दोन महिन्यात संघाची बांधणी करून मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार असून जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. असं असताना टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या फॉर्मात असल्याने आशा वाढल्या आहेत. कारण डावखुऱ्या फलंदाजाने मागच्या दोन वर्षात टी20 फॉर्मेटमध्ये आक्रमक खेळीने टीम इंडियाला विजयाच्या ट्रॅकवर आणलं आहे. पण अभिषेक वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आपण अष्टपैलू भूमिकेत असू असं दाखवून दिलं आहे. कारण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने ते सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा दोन्ही बाजूने योगदान देऊ शकतो. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने पुडुचेरीविरुद्ध सुरुवातीला आक्रमक खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत विकेटही काढल्या.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पंजाब संघाचं कर्णधार अभिषेक शर्माच्या खांद्यावर आहे. पुडुचेरीविरुद्ध प्रथम फलंदाजी आल्यानंतर अभिषेक शर्मा मैदानात उतरला. अभिषेक शर्मा मैदानात उतरला तर संघाचा भार हलका करून जातो ते खरं आहे. अभिषेक शर्मा या सामन्यात फक्त 9 चेंडू खेळला. पण त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारत 34 दावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 377.77 चा होता. अभिषेक शर्मा सामन्याच्या 15व्या चेंडूवर बाद झाला. पण तिथपर्यंत टीमला लय मिळवून दिली होती. त्याच्या आक्रमक खेळीनंतर इतर खेळाडूंनी धावांमध्ये भर घातली. संघाने 20 षटकात 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं.

अभिषेक शर्माने गोलंदाजीवेळी पहिलंच षटक हाती घेतलं. तसेच चौथ्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. पुढच्या षटकात आयुष गोयलने दोन विकेट काढल्या. तर वैयक्तिक तिसरं षटक टाकताना अभिषेक शर्माने दुसरी विकेट काढली. त्यानंतर पाचव्या षटक आणि त्याचं वैयक्तिक तिसरं टाकत त्याने पुडुचेरीचा कर्णधार अमन खानला बाद केलं. अभिषेक शर्माने एकूण 4 षटकं टाकली आणि 23 धावा देत 3 गडी बाद केले. पुडुचेरीचा संपूर्ण संघ 138 धावांवर बाद झाला. स्पर्धेतील गट टप्प्यातील पाच सामन्यांमधील पंजाबचा हा तिसरा विजय आहे. संघाला दोन पराभव पत्करावे लागले. सध्या, संघ एलिट गट क मध्ये बंगालच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.

Follow Us
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा