
भोजपुरी टीव्ही अभिनेत्री मोनालिसा तिच्या चाहत्यांमध्ये खास स्टाईलसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असणारी मोनालिसा आपल्या बोल्ड स्टाईलनं अनेकदा चाहत्यांना वेड लावते. नुकताच तिने तिच्या वैयक्तीक आयुष्याला घेऊन एक खळबळ जनक खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असणारी मोनालिसा तिच्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे ही चर्चेत असते. तिने बिग बॉस 10 मध्ये देखील सहभाग घेतला होता. यावेळी तिने त्या लग्नाच्या आधीच प्रेग्नेंटबद्दल अनेक रहस्यांवरून पडदा उठवला आहे.

बिग बॉस 10मध्ये मोनालिसा पती विक्रांत सिंह राजपूत आणि मनू पंजाबी सारख्या कलाकारांसोबत दिसली होती. बिग बॉस 10 शो दरम्यान मोनालिसा आणि मनू पंजाबी यांच्यामध्ये जास्त जवळीक दिसून आली.

एका टास्क दरम्यान मोनालिसाने मनू पंजाबी याला किस्ससुद्धा केलं होतं. याचं शोमध्ये एका टास्कमध्ये मोनालिसाने स्वामी ओम यांच्यावर ओरडून ती मनूच्या मुलाची आई होणार आहे असे सांगितले होते. हे ऐकून घरातील सदस्यांना आणि फॅन्सलासुद्धा धक्का दिला होता.

मोनालिसा नुकतंच मालदीवमध्ये सुट्टीवर गेली होती. तिथून मोनालिसाने तिचे बिकिनी फोटो शेअर केले जे खूप व्हायरल झाले होते.

मोनालिसाने 'ब्लॅकमेल' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमात मोनालिसाने सुनील शेट्टी आणि अजय देवगणसोबत काम केले होते.

मोनालिसा शेवटी नमक इश्क का मध्ये दिसली होती. तिने तिच्या आगामी प्रकल्पांबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.