
कांतारा हा कमी बजेटचा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने मोठा धमाका केला. चाहत्यांनी या चित्रपटाला मोठे प्रेम दिले. कांतारा चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीचे काैतुक केले गेले.

आता ऋषभ शेट्टी याच्या कांतारा 2 चित्रपटाबद्दल एक अत्यंत मोठे अपडेट पुढे आलंय. चित्रपटाचे काम सध्या सुरू असून कांतारा 2 चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू केली जाईल.

कांतारा 2 चित्रपटाची शूटिंग ही डिसेंबरमध्ये सुरू केली जाईल. ऋषभ शेट्टी सध्या चित्रपटाच्या कामात बिझी आहे. आॅगस्ट 2024 पर्यंत सर्व शूटिंग संपणार असल्याचे सांगितले जातंय.

ऋषभ शेट्टी दुसऱ्या भागासाठी शारीरिक प्रशिक्षण घेत असल्याचे देखील सांगितले जातंय. 30 सप्टेंबरला कांतारा हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने धमाका केला.

कांतारा चित्रपटापासून ऋषभ शेट्टी हा खूप जास्त चर्चेत आहे. ऋषभ शेट्टी याची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.