
मालती स्वत: चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण मालतीसोबत आता तिच्या वहिनीची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा आहे. मालतीची वहिनी पहिल्यापासून तिची चांगली मैत्रीण आहे.

मालतीच्या वहिनीच नाव जया चाहर आहे. दीपक चाहरने वर्ष 2021 मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये जया चाहरला प्रपोज केलं होतं. दोघांची भेट मालतीच्या माध्यमातून झालेली. त्यामुळे लग्नापर्यंत हे नातं गेलं.

ज्यावेळी जयाचे फोटो व्हायरल झाले, त्यावेळी लोकांना कोणीतरी ती विदेशी आहे असं वाटलं. मालतीने सोशल मीडियावर पोस्ट केलेली की, मला वहिनी मिळाली, ती परदेशी नाही, तर दिल्लीची आहे.

जयाचं फिल्मी दुनियेशी काही कनेक्शन नाहीय. लोकांना ती पहिल्या नजरेत मॉडलं वाटते. जया आधी कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करायची. पण आता तिने स्वत:चा बिझनेस सुरु केला आहे.

जयाचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज एका अभिनेता आणि मॉडल आहे. बिग बॉस आणि स्प्लिट्स विला सारख्या शो चा तो भाग राहिला आहे. स्प्लिट्स विलाच्या दुसऱ्या सीजनमधील तो विनर आहे.