बाबो.., बिग बॉस 20 मधील या स्पर्धकाचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त फॉलोअर्स, सौंदर्य पाहूनच…
सध्या बिग बॉस 20 च्या सीझनला सुरुवात झाली असून यामध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. पण सध्या या सीझनमधील एका स्पर्धकाची प्रचंड चर्चा रंगली आहे. जिचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.

सलमान खानच्या सूत्रसंचालनाखाली ‘बिग बॉस 20 ’ला 6 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवसापासून या पर्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
यंदाच्या पर्वात मोठ्या बॉलिवूड स्टार्सची कमी असल्याची नाराजी काही प्रेक्षकांनी व्यक्त केली असली तरी घरातील एका स्पर्धकाची सोशल मीडिया लोकप्रियता मात्र अनेक दिग्गज कलाकारांनाही मागे टाकणारी आहे.
ही स्पर्धक म्हणजे 23 वर्षीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार आरिशफा खान. आरिशफाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल 2.91 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.
विशेष म्हणजे करिना कपूर, जान्हवी कपूर, अल्लू अर्जुन आणि प्रभास यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सपेक्षाही आरिशफाचा आकडा मोठा आहे.
कोणत्याही मोठ्या चित्रपटाच्या पाठबळाशिवाय केवळ टीव्ही मालिका, डिजिटल कंटेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने एवढी मोठी फॅन फॉलोइंग निर्माण केली आहे. 2003 मध्ये जन्मलेल्या आरिशफाने वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी ‘छल-शह और मात’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले.