
Karishma Tanna Photos : छोट्या पडद्यावरची 'नागीन' आणि 'खतरों के खिलाडी' या रिऍलिटी शोची विजेती आणि अभिनेत्री करिश्मा तन्ना कायम तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. करिश्मा कायम स्वतःच्या बोल्डलूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

आता पुन्हा करिश्माने स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. करिश्मा लग्नानंतर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता करिश्मा सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

करिश्माने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. करिश्मा कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. करिश्माची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

करिश्माने बिग बॉसमध्ये चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिवाय बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे.