असं काय घडलं की राखीने स्वत:ला दिली मोठी शिक्षा, थेट घरातील सर्वच सदस्य हादरले, Video व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रामा होताना दिसत आहे. अशातच आता राखीने थेट मोठं पाऊल उचललं असून तिने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आहे.

| Updated on: Mar 06, 2026 | 3:03 PM
1 / 5
‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत हिच्या एन्ट्रीमुळे बिग बॉस मराठीच्या सीझन 6 मध्ये घरात सध्या प्रचंड ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी आणि राकेश बापटच्यातील वाद आणखी तीव्र झाल्याचे दिसून येते.

2 / 5

काही दिवसांपासून राकेश आणि राखी यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, राकेश आणि तन्वी कोलते यांचा रोमँटिक डान्स पाहून राखी आधीच दुखावली होती. नवीन प्रोमोमध्ये राकेश राखीशी बोलताना आपण फक्त मित्र आहोत असे स्पष्ट सांगतो.

3 / 5

राकेशच्या या वक्तव्यामुळे राखी आणखी भावूक होते. म्हणजे आपण फक्त मित्रच राहणार? असा प्रश्न ती विचारते. त्यावर राकेश मला कोणालाही दुखवायचे नाही असे म्हणत तेथून निघून जातो.

4 / 5

यामुळे निराश झालेली राखी I am loser असे म्हणत रडू लागते आणि संतापाच्या भरात थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. तिची ही कृती पाहून घरातील इतर सदस्य तिला बाहेर काढण्यासाठी धाव घेतात.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us