
बिग बाॅस ओटीटी 2 धमाल करताना दिसत आहे. आकांक्षा पुरी हिने कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केल्याने मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी शोच्या निर्मात्यांवर टिका केलीये.

आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा फलक नाज हिचा क्लास घेताना दिसणार आहे. दुहेरी भूमिका घेत असल्याने सलमान फलक हिला खडेबोल सुनावताना दिसणार आहे.

फलक नाज हिला सलमान खान म्हणतो की, अभिषेक आक्रमक आहे, त्यामुळे त्याचे संगोपन चुकीचे झाले म्हणतेस आणि त्याच्या कुटुंबियांनामध्ये आणते.

तुला अविनाश आक्रमक होताना दिसत नाही, नाही का? यावेळी सलमान खान हा पूजा भट्ट हिला देखील प्रश्न विचारतो. सलमान खान यावेळी घरातील सदस्यांचा क्लास घेताना दिसत आहे.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 मधून बाहेर पडलीये. आकांक्षा हिच्यावर मोठ्या प्रमाणात सतत टिका होताना देखील दिसतंय.