
अभिनेत्री बिपाशा बसू ही कायमच चर्चेत असते. सध्या बिपाशा बसू ही चित्रपटांपासून दूर असून सध्या कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना दिसत आहे.

बिपाशा बसू हिचा आज 45 व्या वाढदिवस आहे. बिपाशा बसू वाढदिवसानिमित्त खास मालदीवला गेलीये. पती करण सिंह ग्रोवर आणि मुलगी देवी देखील सोबत आहेत.

बिपाशा बसू हिचे मालदीवमधील खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मुलगी आणि पतीसोबत खास वेळ घालवताना बिपाशा दिसतंय.

हेच नाही तर बिपाशा बसू पुलमध्ये पतीसोबत रोमँटिक होताना देखील दिसत आहे. एकदम जबरदस्त लूकमध्ये बिपाशा बसू दिसतंय. हे फोटो चांगले व्हायरल होत आहेत.

बिपाशा बसू हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. बिपाशा बसू हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बिपाशा बसूच्या फोटोंनंतर इंटरनेटचा पारा वाढला आहे.