
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'ब्लॅक' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. याच चित्रपटात अभिनेत्री आयेशा कपूरने लहानपणीच्या राणीची भूमिका साकारली होती.

या चित्रपटातून आयेशाने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तीच आयेशा आता 29 वर्षांची झाली असून तिचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. आयेशा सोशल मीडियावर सक्रिय असून विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

अभिनेत्रीसोबतच आयेशा आता न्यूट्रिशन कोचसुद्धा बनली आहे. आयआयएन न्यूयॉर्कमधून तिने न्यूट्रिशन हेल्थ कोचचं सर्टिफिकेट मिळवलं आहे. सोशल मीडियावर ती त्यासंबंधीचे व्हिडीओसुद्धा पोस्ट करते. इतकंच नव्हे तर आयेशाने तिच्या आईसोबत मिळून त्याचा व्यवसायसुद्धा सुरू केला आहे.

'ब्लॅक' या चित्रपटाला आता 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने खास पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आयेशाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झाल्यास, ती तिच्या कॉलेजच्या मित्राला डेट करतेय. अॅडम ओबेरॉय असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. त्याच्यासोबतचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.