‘या’ 6 काळ्या सुपरफुड्सची बरोबरी कोणीच करु शकत नाही, आरोग्यास अत्यंत उपयुक्त
आजत्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण त्याचा परिणाम भविष्यात आपल्या आरोग्यावर होतो... त्यामुळे रोजच्या आहारात 'या' 6 काळ्या सुपरफुडचा समावेश करा. ज्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील...

जर तुम्हाला गोड खायला आवडत असेल पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दलही जागरूक असाल, तर काळे मणुके तुमच्यासाठी एक उत्तम सुपरफूड आहेत. ते तुमचे रक्त शुद्ध करतात. केस गळणे थांबवतात. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात. शिवाय, ते पचनसंस्था मजबूत करतात.

काळी द्राक्षे आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात. ती रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर, काळ्या द्राक्षांमुळे मेंदूची कार्यक्षमताही वाढते. ती दृष्टीसाठीही उत्कृष्ट आहेत.

काळ्या तिळामध्ये कॅल्शियम आणि लोह असते. ते तुमची हाडे मजबूत करतात. काळ्या तिळातील पोषक घटक सांधेदुखी आणि सूजेपासून आराम देतात.

काळे बीन्स तुमच्या शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करतात. काळ्या बीन्समध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते.

चिया बिया खूप लोकप्रिय आहेत. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रथिने असतात. त्या शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि पचनसंस्था सुधारतात.

दररोज सकाळी मूठभर भिजवलेले काळे चणे खाल्ल्याने तुमचे शरीर मजबूत होऊ शकते. हे प्रथिने, लोह आणि फायबरचा सर्वोत्तम स्रोत आहे. जे जिममध्ये जातात त्यांच्यासाठी हे एक खरे देशी सुपरफूड आहे. यामुळे ॲनिमिया (रक्तक्षय) लवकर दूर होतो.