
अमिताभ बच्चन हे त्यांच्या आगामी कल्कि 2898 एडी या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांनी मुंबईमध्ये मोठी गुंतवणूक केलीये आणि मोठी प्रॉपर्टी खरेदी केलीये.

अमिताभ बच्चन यांनी मुंबईत 60 कोटी रुपयांमध्ये एक नव्हे तर तीन व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत आणि याची नोंदणी 20 जून 2024 रोजी झालीये.

रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी 60 कोटी रुपयांमध्ये 8,429 स्क्वेअर फूटचे तीन ऑफिस स्पेस खरेदी केले आहेत. मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये ही मालमत्ता खरेदी केलीये.

चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच अमिताभ बच्चन यांनी मोठा धमाका केल्याचे म्हणावे लागेल. अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. यासोबतच अमिताभ बच्चन यांची मुंबईच्या अनेक भागांमध्ये मोठी संपत्ती आहे.