
चंद्रपूर : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया यांना ताडोबाची भुरळ पडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात या जोडीने सहकुटुंब सफर केली.

या जोडीने व्याघ्र प्रकल्पाच्या खुटवंडा प्रवेशद्वारातून ताडोबात प्रवेश केला. प्राथमिक माहितीनुसार पहिल्या फेरीत या जोडीला वाघाने चकवा दिला आहे. मात्र त्यांना अन्य वन्यजीवांचे दर्शन झाले आहे.

ही जोडी ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या एका खासगी रिसॉर्टमध्ये 2 दिवस मुक्कामी आहे.

रितेश आणि जेनेलिया व्याघ्र प्रकल्पात मनसोक्त फिरत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका जीपवर हे दोघे बसलले असून ते जंगलसफरीचा आनंद लुटत आहेत.

रितेश-जेनेलिया यांच्यासोबत त्यांची मुलंदेखील आहेत. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध वाघांचे दर्शन होईल अशी अशी त्यांना अपेक्षा आहे.