‘सूनबाई घरात आल्यापासून…’; सनी देओलने सुनेबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा
आता गेल्या काही दिवसांपूर्वी गदर 2 चित्रपटामुळे सनी देओल चर्चेत आलेला. तर यादरम्यान त्याच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला होता. अशातच सनी देओलने आपल्या नव्या सूनबाईबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय.

नुकताच सनी देओल हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी सनी देओल याने काही मोठे खुलासे केले. हेच नाही तर आपल्या सुनेचे काैतुक करतानाही सनी देओल दिसले.

सनी देओलने मुलगा करण देओल याच्या पत्नीचे काैतुक केले. द्रिशा आचार्य ही करण देओलच्या पत्नीचे नाव आहे. द्रिशा आचार्यबद्दल बोलताना सनी दिसला.

सनी देओल म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरात काही गोष्टी अजिबातच व्यवस्थित सुरू नव्हत्या. करणचे लग्न झाले आणि द्रिशा आचार्य घरात आली, तेव्हापासून सर्व गोष्टी चांगल्या घडत आहेत.

करणच्या लग्नानंतर मी सून नव्हे तर लेकीला घरी आणले, असेही सनीने म्हटले. द्रिशा आचार्य ही प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. तिचे शालेय शिक्षण दुबईत झाले.

द्रिशा आचार्यचे जवळपास सर्वच शिक्षण विदेशातच झाले. आता सनी देओल याने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सनी देओलचा गदर चित्रपट हिट ठरलाय.