
सलमान खान याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बजरंगी भाईजान ठरलाय. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, सलमान खान हा कधीच निर्मात्यांची पहिली पसंद नव्हता.

बजरंगी भाईजान चित्रपटाची सर्वात अगोदर आमिर खान याला ऑफर होती. रिपोर्टनुसार आमिर खानने स्क्रीप्टमध्ये काही बदल करण्यास सांगितले. मात्र, ते बदल होऊ शकले नाहीत आणि आमिर खानने चित्रपट करण्यास नकार दिला.

आमिर खान याच्यानंतर या चित्रपटाची ऑफर हृतिक रोशन याला होती. मात्र, हृतिक रोशन यानेही चित्रपट करण्या स्पष्ट नकार दिला. यानंतर एक चर्चा जोरदार रंगताना दिसली.

हृतिक रोशन याने नकार दिल्यानंतर रजनीकांत यांनाही या चित्रपटाची ऑफर असल्याचे सांगितले जाते. मात्र, रजनीकांत यांनीही या चित्रपटाला नकार दिला.

शेवटी सलमान खान याने या चित्रपटाला होकार दिला आणि हा सलमानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. धमाकेदार अभिनय सलमान खानने केला.