
नसीरुद्दीन शाह हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. नसीरुद्दीन शाह यांची वेब सीरिज नुकताच रिलीज झालीये.

नसीरुद्दीन शाह यांनी नुकताच एक मुलाखती दरम्यान एक अत्यंत मोठे विधान केले आहे. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन बनली आहे, हे सरकार हे चित्रपटाच्या माध्यमातून पसरवत आहे.

निवडणूकांमध्ये मते मिळवण्यासाठी चित्रपटांचा वापर केला जात असल्याचे देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले. सुशिक्षित लोकांमध्येही मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवला जात आहे आणि द्वेष करणे ही आजकाल फॅशन झाली आहे.

नसीरुद्दीन यांनी कर्नाटक निवडणुकीचा उल्लेख करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. मुळात म्हणजे नसीरुद्दीन शाह हे नेहमीच भाजपावर टिका करताना दिसतात.

नसीरुद्दीन शाह यांनी नाव न घेता द केरळ स्टोरी चित्रपटावर मोठी टिका केली आहे. आता यामुळे नसीरुद्दीन शाह हे तूफान चर्चेत नक्कीच आले आहेत.