
परिणीती चोप्राने अनेक चांगले चित्रपट धुडकावले. या लिस्टमध्ये पहिलं नाव 'पीकू'च आहे. 2015 मध्ये हा चित्रपट आलेला. दुसऱ्या प्रोजेक्टसाठी परिणीती चोप्राने हा चित्रपट नाकारलेला.

आलिया भट्टच्या 'उडता पंजाब'साठी परिणीती चोप्रा पहिली चॉईस होती. या चित्रपटात शाहीद कपूरशिवाय दिलजीत दोसांझ आणि करीना कपूर खान सुद्धा होती.

RRR हा एसएस राजामौली यांनी दिग्दर्शितक केलेला चित्रपट आहे. आलिया या चित्रपटात सपोर्टिंग रोलमध्ये होती. या रोलसाठी आधी श्रद्ध कूपरला अप्रोच करण्यात आलं होतं. त्यानंतर परिणीतीशी बोलण झालं. पण तिने नकार दिला.

सलमान खानच्या 'किक' मध्ये जॅकलीन फर्नांडीस दिसली. रिपोर्ट्सनुसार हा रोल आधी परिणीत चोप्राला ऑफर झाला होता. पण तिने नकार दिला.

रणबीर कपूरच्या 'एनिमल'मध्ये मेकर्सना आधी परिणीत चोप्राला कास्ट करायच होतं. पण नंतर निर्णय बदलला. असं म्हटलं जातं की, कबीर सिंहमधून सुद्धा परिणीतीला रिप्लेस करण्यात आलं.