Ayesha Khan : मराठी मुलगी… गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा मराठमोळा लूक, फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली

Ayesha Khan : अभिनेत्री आयेशा खान तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे. गणेशोत्सवासाठी आयेशा खान हिने मराठमोळा लूक कॅरी केला आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 3:40 PM
1 / 5
'शारारत' या गाण्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री आयेशा खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती प्रत्येक सण खूप उत्साहात साजरी करते. आयेशाने गणेश चतुर्थीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला, ज्यासाठी तिने खास मराठी लूक केला होता.

'शारारत' या गाण्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री आयेशा खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती प्रत्येक सण खूप उत्साहात साजरी करते. आयेशाने गणेश चतुर्थीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला, ज्यासाठी तिने खास मराठी लूक केला होता.

2 / 5

आयेशा खानने तिच्या या मराठी लूकचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - "पदरात चांदणं, नजरेत स्वप्नं".

3 / 5

आयशाने सुंदर गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर तिने मरून रंगाचा बॅकलेस ब्लाउज घातला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने नाकात मराठी नथ आणि कपाळावर चंद्रकोर बिंदी लावली आहे. केसांचा मेसी अंबाडा बनवून तो घुंगरांनी सजवला आहे.

4 / 5

फॅन्सनीही आयशाच्या या फोटोंवर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. एका युजरने लिहिलं, "इंस्टाग्रामवर आयेशापेक्षा सुंदर कोणीही नाही." दुसऱ्या एका युजरने लिहिले - "खूपच सुंदर." तर आणखी एका युजरने कमेंट केली - 'मेरी मराठी मुलगी'.

5 / 5

कामाबद्दल बोलायचं तर, आयशा खान शेवटची कपिल शर्मासोबत 'किस किस को प्यार करूं' या सिनेमात झळकली होती. त्याआधी अभिनेत्रीने 'धुरंधर'च्या 'शारारत' या गाण्यात झळकली होती, ज्यासाठी तिचे खूप कौतुक झालं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us