वयाच्या 38 व्या वर्षी जिनिलिया हिचा रॉयल अंदाज, तिसऱ्या फोटोवर असंख्य चाहते फिदा
अभिनेत्री जिनिलिया देशमुख अनेक वर्षांपासून अभिनय विश्वापासून दूर होती. कुटुंबाच्या जबाबदारीत अडकलेल्या जिनिलिया हिने ब्रेकनंतर तब्बल 10 वर्षांनी अभिनेय विश्वात पदार्पण केलं आणि 'वेड' सिनेमात झळकली. पण आता अभिनेत्री तिच्या सिनेमामुळे नाही तर लूकमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची ओळख बॉलिवूडचं पॉवरफूल कपल म्हणून आहे. तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं, आता दोघे चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

सध्या जिनिलिया हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

रितेश आणि जिनिलिया यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दोघे लवकरच 'राजा शिवाजी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटील येणार आहेत. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला, आता चाहते सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमात अनेक मोठ्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

जिनिलिया दोन मुलांची आई आहे. पण अभिनेत्रीचं फिटनेस पाहून कोणीत म्हणणार नाही की, जिनिलिया हिला दोन मुलं असून ते शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. मुलांसोबत देखील जिनिलिया हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

जिनिलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र जिनिलिया हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.