Hairstyle Tips: तुमचा चेहरा गोल, चौकोनी की लांब आहे, कोणता हेअरकट दिसेल चांगला? ‘या’ टिप्स ठरतील बेस्ट
Hairstyle Tips: अनेक महिलांना कायम पडणारा एक प्रश्न म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कोणता हेअरकट चांगला दिसेल. तर जाणून तुमचा चेहरा गोल, चौकोनी आहे की लांब? कोणता हेअरकट तुमच्या चेहऱ्यावर चांगला दिसेल... या टिप्स ठरतील बेस्ट...

Hairstyle Tips: अनेक महिलांना केस वाढवायला आवडतात. पण काही महिला अशा देखील असतात. ज्यांना लहान केस आवडतात. पण पार्ललमध्ये गेल्यानंतर कोणता हेअरकट करायचा याबद्दल कळत नाही. पार्लरमध्ये जाऊन कॅटलॉगची पानं चाळून किंवा सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहून एखादी छान हेअरस्टाईल निवडणं हा काही योग्य मार्ग नाही. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा आकार न समजता चुकीचे केस कापले, ते चांगलं दिसणार नाही. कारण, दुसऱ्या कोणाच्या चेहऱ्यावर छान दिसणारी हेअरकट तुमच्या चेहऱ्यावर खरंच शोभेल हे गरजेचं नाही. म्हणून, पार्लरच्या खुर्चीत बसण्यापूर्वी, नेमकी कोणती हेअरकट तुम्हाला सर्वात सुंदर आणि आकर्षक बनवेल हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
गोल चेहरा : जर तुमचा चेहरा गोल असेल, तर तुम्ही तुमचे केस अशा प्रकारे कापले पाहिजेत की ते थोडे लांब दिसतील. लेयर्ड कट किंवा साईड-पार्टेड हेअर तुम्हाला खूप शोभून दिसतील. मात्र, कधीही खूप छोटा बॉब कट कापू नका, त्यामुळे तुमचा चेहरा आणखी गोल दिसेल.
अंडाकृती चेहरा : अंडाकृती चेहरा असलेले लोक खरोखरच भाग्यवान असतात. स्टायलिस्टच्या मते, या प्रकारच्या चेहऱ्यावर जवळजवळ कोणतीही हेअरकट छान दिसते. मग ती शॉर्ट कट असो किंवा लेयर्स असलेले लांब केस, तुम्ही कोणतीही स्टाईल सहजपणे कॅरी करू शकता.
चौकोनी चेहरा : जर तुमचा जबडा रुंद असेल, तर तुमच्या चेहऱ्याचा आकार सौम्य करणं महत्त्वाचं आहे. हलकी बॅंग्स किंवा कुरळ्या केसांसह लेयर्ड कट तुमच्यासाठी उत्तम आहे.
लांब चेहरा : जर तुमचा चेहरा खूप लांब असेल, तर हेअरस्टाईल अशी असावी की ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या बाजू थोड्या रुंद दिसतील. तुम्ही समोरच्या बाजूला छोटी बट ठेवू शकता. जर तुमचे केस लांब आणि सरळ असतील, तर तुमचा चेहरा अधिक लांब दिसेल. त्यामुळे, केसांना थोडीशी लट किंवा लहरी लुक देणं अधिक चांगलं राहील.
हेअरकट करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा उन्हात आणि घाम येत असेल तर केसांची योग्य काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. चांगला शॅम्पू आणि कंडिशनर वापरायला विसरू नका. आता, तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तुमची आवडती हेअरकट निवडा आणि सर्वांच्या गर्दीत उठून दिसा.
