
‘ये रिश्ता क्या कहलाता’ या मालिकेतून अक्षराच्या भूमिकेत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत आहे.

आता हीनाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना पाहायला मिळालाय. या फोटोमध्ये तिनं सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. एवढंच नाही तर तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा लूक प्रचंड आवडलाय.

अभिनेत्री हीना खान मालिका विश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी नेहमी आपल्या हॉट अंदाजानं चाहत्यांची मनं जिंकते.

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतूनही हीनाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.