
बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे काजोल आणि अजय देवगण हे आपल्या मुला मुलीसोबत मुंबईत अत्यंत आलिशान घरात राहतात.

अजय देवगण आणि काजोल यांचे घर अत्यंत आलिशान असून त्यांच्या घराचे खास फोटो पाहा. खास डिझाईन हे घर करण्यात आले. काजोल कायमच घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

अजय देवगण आणि काजोलच्या घराचे नाव 'शिवशक्ति' असून मुंबईच्या जुहू परिसरात त्यांचे हे घर आहे. अजय आणि काजोलच्या घराचे प्रवेशद्वार खास डिझाईन करण्यात आलंय.

घरात प्रवेश केल्यावर एक मोठा जीना देखील आहे. बऱ्याचदा काजोल ही येथेच बसून फोटो काढते. ते फोटो काजोल हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मोठी बाल्कनी देखील काजोलच्या घराला आहे. अनेकदा काजोल हिने बाल्कनीतील फोटो शेअर केले आहेत. अजय देवगणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.