Kajol: क्लासी फोटो शेअर करत काजोल असं काय म्हणाली? कॅप्शनने वेधलं लक्ष
Kajol: बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अभिनेत्री काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काही क्लासी फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
नारंगी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत तनुश्री हिने कॅप्शनमध्ये, 'खरं सांगायचं तर, मला काही नवीन वर्ष नकोय... मला एखादं 'थोडे जुनं' वर्ष हवंय... कदाचित 2018? किंवा अगदी 1995?' असं लिहिलं आहे.
काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.
आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. दिवसागणित काजोल हिचा बोल्डनेस वाढतोय असं म्हणायला देखील हरकत नाही...
90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.