AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का! 40 वर्षांपासून निष्ठावंत असलेल्या नेत्याने साथ सोडली; ‘मातोश्री’वर मोठा पक्षप्रवेश!

हिंगोलीमध्ये कळमनुरी, ओंढा नागनाथ, आखाडा बाळापूर या भागात मोठा जनसंपर्क असलेले नेते म्हणून जॅकी कुरेशी यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती. अखेर आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का! 40 वर्षांपासून निष्ठावंत असलेल्या नेत्याने साथ सोडली; 'मातोश्री'वर मोठा पक्षप्रवेश!
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 29, 2026 | 3:35 PM
Share

Maharashtra Politics:  राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात सध्या डिलिमिटेशन विधेयकावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे राहुल गांधी या विधेयकाविरोधात मित्रपक्षांची मनधरणी करत असतानाच महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश होणार आहे.

मातोश्रीवर मोठा पक्षप्रवेश; काँग्रेसला धक्का! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या 30 वर्षांपासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते असलेले हिंगोलीतील ज्येष्ठ नेते जॅकी उस्मान कुरेशी यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. आज शिवसेना मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जक्की कुरेशी हे शिवबंधन बांधणार आहेत.

हिंगोलीमध्ये कळमनुरी, ओंढा नागनाथ, आखाडा बाळापूर या भागात मोठा जनसंपर्क असलेले नेते म्हणून जॅकी कुरेशी यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती. अखेर आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडून ते शिवबंधन बांधून घेणार आहेत.

साताऱ्यात महेश शिंदे विरुद्ध शंभुराज देसाई

दुसरीकडे, साताऱ्यातील कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांनी शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवथर येथील आकाश साबळे आणि पैलवान सचिन शेलार यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या घडामोडीमुळे कोरेगावच्या स्थानिक राजकारणात आमदार महेश शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगाव येथील शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी आपण भावासारखे खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली कोणतेही पद न मागता जनतेच्या कामांसाठी धडपडणाऱ्या राजाभाऊंना कोरेगावकरांनी भक्कम साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!