शासन दरबारी फेरविचार करण्यासाठी माझा प्रयत्न राहील.. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोठे विधान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे विधान केले. दत्तात्रय भरणे यांनी डिलिमिटेशन बिलावर मोठे विधान केले. शरद पवार यांच्या विधानाबद्दल बोलताना दत्तात्रय भरणे दिसले. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच मोठे विधान केले. दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, दुष्काळाची परिस्थिती आहे. एका बाजूने नीरा नदीमध्ये पाणी सोडा.. जे आमचं रोटेशन आहे ते रद्द होईल. कालवा समितीने आम्हाला अगोदर कळवल आहे.. नीरा नदीचे शेतकरी ती पण शेतकरी आहेत. इंदापूर तालुक्याचा विचार केला तर.. 95 टक्के लोक हे कॅनल वर अवलंबून आहेत. पाच ते दहा टक्के नदीवर अवलंबून आहेत. दोघांचा वेळ करून.. दोघांवर ही अन्याय होणार नाही.. विखे पाटलांना मार्ग काढण्यासाठी विनंती केली जाणार… यातून मार्ग काढला जाईल. वीज कपातीवर बोलताना दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, पुणे कलेक्टर सोलापूर कलेक्टर दोघांचे आदेश आहेत. शासनाला विनंती करावी लागेल.. उजनीवर पिण्याच्या पाण्याची योजना खूप अवलंबून आहे.
शासनानेच बियाण्याच्या चाऱ्याचे जनावरांच्या चाऱ्याचं वाटप केला आहे. शेतीच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी फेरविचार करावा लागेल… शासन दरबारी फेरविचार करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. शेवटी उजनी धरण आहे उजनी धरणावर अवलंबून असणारे शेतकरी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल.
डिलिमिटेशन बिलावर बोलताना भरणे यांनी म्हटले की, डिलिमिटेशन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निर्णय घेतला. सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे शरद पवारांची भेट घेतली. डिलिमिटेशन बाबतीमध्ये खरं सांगतो. महिला धोरण हे झालं पाहिजे. शेवटी नरेंद्र मोदी, अमित शहा असतील सगळ्यांनी त्याबाबतीची भूमिका मांडली आहे. सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे.
महिलांना सुद्धा संधी दिल्यानंतर महिला सुद्धा चांगलं काम करतात. महिलांची लोकसभेत विधानसभेत संख्या वाढली पाहिजे. दोन्ही विधेयक आणले आहेत. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा. इंडिया आघाडीत असणारे पक्ष यांनी पाठिंबा दर्शवला आहे. माझं मत असं यात कोणीही राजकारण न करता केंद्र सरकारने जो पर्याय दिला आहे तो सगळ्यांनी स्वीकारावा..
रोहित पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्याच्या मुद्द्यावर बोलताना दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, सुनेत्रा वहिनी काम करण्याला समर्थ आहेत. रोहित दादा पवार यांनी त्याबाबतीत दिलगिरी व्यक्त केली आहे. एकाकी अजिबात पडल्या नाहीत. त्या खंबीर आहेत. पुन्हा एकदा सांगतो रोहित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे…
