काजोलच्या आयुष्यातील खास व्यक्ती, भावना व्यक्त करत म्हणाते, ‘मला खरंच जाणीव झाली तेव्हा…’
अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अता देखील काजोल तिच्या खास पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

आज फ्रेंडशीप डे आहे.. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. अशात अभिनेत्री काजोल हिने देखील काही खास फोटो पोस्ट करत तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या आहे .

सोशल मीडियावर काजोल हिने स्वतःचं आणि लहापणीचे काही फोटो पोस्ट केले आहे. पण अभिनेत्री पोस्टमध्ये कोणाचं नाव लिहिलं नाही. सध्या सर्वत्र फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाम केलाय...

फोटो पोस्ट करत काजोल म्हणते, माझ्या जन्मापासून आणि त्याही आधीपासून... जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिला 'फ्रेंडशिप डे'च्या खूप खूप शुभेच्छा. ती माझ्यासाठी किती मोलाची होती आणि कोणताच विचार न करता तिने माझ्यासाठी किती संघर्ष केला, हे समजायला मला खूप वेळ लागला...'

पुढे अभिनेत्री म्हणाली, पण आता मला तिची खरंच जाणीव झाली आहे; मी तिला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागले आहे आणि तिच्यावर खूप जास्त प्रेम करू लागले आहे... आणि शेवटी, मी तिला वचन देते की, मीही कायम तिच्यावर प्रेम करेन आणि तिच्यासाठी खंबीरपणे उभी राहीन.... असं देखील काजोल पोस्टमध्ये म्हणाली आहे...

काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील काजोल हिचे हीट सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. सोशल मीडियावर देखील काजोल हिच्या सिनेमांचे लोकप्रिय सीन व्हायरल होत असतात. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.