
कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अनेकदा कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूड कलाकार असतात. कंगना राणावत ही बाॅलिवूड कलाकारांवर जोरदार टीका करताना दिसते.

कंगना राणावत आणि वाद हे समीकरण देखील गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. कंगना राणावत हिने नुकताच अत्यंत गंभीर आरोप हे बाॅलिवूड कलाकारांवर केले आहेत.

हेच नाही तर कंगणा राणावतने अवैध गोष्टींमध्ये बाॅलिवूड कलाकार फसले असल्याचे म्हटले. व्हाॅटसअॅप आणि मेल हॅक बाॅलिवूडच्या कलाकारांकडून केले जात असल्याचे कंगनाने म्हटले.

सरकारने याविरोधात कारवाई देखील करावी अशी मागणीच थेट कंगना राणावत हिने करून टाकली आहे. अवैध गोष्टींमध्ये बाॅलिवूडचे कलाकरांचे पाय खोलात असल्याचे कंगनाने म्हटले.

हेच नाही तर मोठी नावे पुढे येणार असल्याचेही कंगनाने म्हटले आहे. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. कंगना हिच्या या विधानंतर जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत.