
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान कायम चर्चेत असतो. सेलिब्रिटी किड असल्यामुळे तैमूर याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तैमूर अली खान याची चर्चा रंगत आहे.

तैमूर याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील तैमूर याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

सध्या तैमूर याच्या शिक्षणाबद्दल चर्चा रंगत आहे. रिपोर्टनुसार, तैमूर धिरुबाई अंबानी शाळेत शिकत आहे. अंबानी स्कूल मुंबईतील सर्वात महागड्या स्कूल पैकी एक आहे.

तैमूर याच्या शिक्षणासाठी करीना मोठी किंमत मोजते. मिळालेल्या माहितीनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीपर्यंत फी १ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.

तैमूर याच्या शाळेतील फोटो करीना सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सर्वत्र करीना कपूर आणि तिच्या मुलांची चर्चा आहे. करीना आणि सैफ यांच्या लहान मुलाचं नाव जहांगीर अली खान असं आहे..