90 च्या दशकातील अप्सरा…, वयाच्या 55 व्या वर्षी मनीषाचा हटके लूक
अभिनेत्री मनीषा कोईराला हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते, सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे. सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त मनिशा हिच्या काही फोटोंची चर्चा रंगील आहे.

साडीच मनिषा हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये साड्या माझा खास छंद आहे... असं लिहिलं आहे. याआधी देखील अभिनेत्रीने अनेकदा साडीत फोटो पोस्ट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे.

मोकळे केस आणि साडीत अभिनेत्रीने फोटो शूट केलं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अनेकांना अभिनेत्रीचा हा हटके लूक आवडलेला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

अनेक वर्षांनंतर मनिषा हीरामंडी वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सीरिजमध्ये मनिषा हिची एक वेगळी बाजू चाहत्यांना पाहायला मिळाली.

सोशल मीडियावर मनिषा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.