
अभिनेत्री नीलम कोठारी हिने सनम चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली. त्यानंतर 80 आणि 90 च्या दशकात हिट चित्रपट दिली.

हेच नाहीतर नीलमचे नाव गोविंदासोबत जोडले गेले. मात्र, काही वर्षे बाॅलिवूडपासून नीलम दूर गेली. आजही नीलम कोठारी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.

आता नुकताच नीलम कोठारी हिने मोठा खुलासा केलाय. नीलम कोठारी म्हणाली, मी स्वत:ला खूप जास्त भाग्यवान नक्कीच समजते. सर्व रोलर कोस्टर राईडसारखे आहे. मी सुद्धा आयुष्यात चढउतार पाहिले आहेत.

मी तुम्हाला पूर्ण इमानदारीने सांगते की, मी इंडस्ट्री सोडली होती. कारण मला वाटले होते की, माझे खासगी आयुष्य संपले आहे. मी आता निवांत झाले.

मी घरातून ऑफिसला जायची आणि ऑफिसमधून घरी यायची आणि आई आणि बायकोच्या जबाबदाऱ्या पार पाडत असत. मी आता धमाकेदारपणे परत आले आहे.